Wednesday, May 3, 2017

तू आणि मी...

मला कधी वाटतं, आपण गुलाबाच्या पाकळ्यांसारखे आहोत, प्रत्येक पाकळीला आपला रंग आणि वास आहेच.... 
पण एकत्र आलो, पाकळ्यांपासून गुलाब बनला की जास्त अर्थपूर्ण आणि सुंदर वाटतं...

कधी वाटतं, आपण hydrogen आणि oxygen सारखे आहोत, वेगवेगळं अस्तित्व आणि गुणधर्म आहेतच, 
पण एकत्र येऊन तयार होणारं पाणी हे खरं जीवन आहे...

रात्री आकाशाकडे पाहताना मला आपण telescope च्या primary आणि secondary mirror सारखे भासतो, ज्यांना आरसे म्हणून वेगवेगळे अस्तित्व आहेच, 
पण एकत्र आले की त्यातून अनुभवास येणारं दृश्य जादुई आहे...

आपण हापूस आंब्यासारखे पण आहोत, गर चविष्ट आहे, कोयी मध्ये नवं झाड तयार करण्याची शक्ती आहे, 
पण गर असल्याशिवाय नुसत्या कोयीला सौंदर्य नाही आणि कोय नसेल तर गराचं पुढे अस्तित्व राहणार नाही....

आपण खळखळत वाहणाऱ्या नद्यांच्या प्रवाहासारखे आहोत का? 
जे संगम झाल्यावर एकमेकात मिसळून जातात आणि एक खोल प्रवाह संथपणे, शांतपणे आणि एकरूप होऊन वाहू लागतो...

आणखी काय सांगू...? 
चहात अदरकचा सुगंध विरघळावा तसं माझं मन तुझ्यात विरघळलंय.... 
आणि हे वाचताना ओलसर झालेल्या तुझ्या डोळ्याच्या कडा आणि दाटून आलेला कंठ, मला जाणवतोय, इतकंच.... :)

Wednesday, February 15, 2017

Dear Trolls, Get well soon...

Trolls ओळखणं खूप सोप्पं आहे, सत्ताधारी पक्षाच्या आशीर्वादाने चालणारी ही एक नवी 'रोजगार हमी योजना' आहे...
आश्वासन दिलेले रोजगार निर्माण होत नाहीयेत, म्हणून ही योजना 'बुडत्या (बुडवलेल्या) अर्थव्यवस्थेला एक तुटक्या काडीचा आधार' ठरू लागलीये...
स्वतःचं असं काही न लिहू शकणारे आणि त्यामुळे trolls च्या post share करून स्वतः troll बनणारे आणि दुसऱ्यांची wall आपल्या किळसवाण्या पिचकाऱ्यांनी रंगावणारे यांची एक नवी जमात अलीकडे उदयास आलीये...
या योजनेचं वैशिष्ट्य म्हणजे हळूहळू सर्वच विचारधारांचे प्रतिनिधी म्हणवणाऱ्यानी कमी-अधिक प्रमाणात याचं अनुकरण करायला सुरुवात केलीये...
पण सध्या या योजनेवर गंडांतर आल्यासारखं दिसतंय. पूर्वी तुफान फॉर्मात असणाऱ्या, यांच्या जीवावर निवडणुका जिंकण्याचं स्वप्न पाहिलं जाणाऱ्या या योजनेला ग्रहण लागतंय की काय, अशी एक शंका दिसू लागलीये...
काहीही करा पण रोज अमुक इतक्या लोकांची लायकी काढाच, इतक्या लोकांच्या wall वर पिचकाऱ्या माराच
अशा target च्या pressure ने या लोकांची खूप दमछाक होतीये असं दिसतंय...
त्यामुळेच की काय पण अलीकडे troll ची quality of comment(?) पण बरीच घसरलेली दिसतेय, काहीही अजूनच फालतू आणि irrelevant comments ची संख्या वाढलेली दिसतेय...
सध्या photoshop या राष्ट्रीय सॉफ्टवेअरचं marketही पूर्वीपेक्षा down झालंय, लोक आता खरे-खोटे फोटो हळूहळू ओळखायला लागले आहेत, त्यामुळे troll ना करावी लागणारी मेहनत वाढलीये, त्यामुळे ही जमात अजूनच सैरभैर झालीये...
कानाशी गुणगुण करणाऱ्या डासाला झटकावं अगदी तसं लोक यांना आजकाल झटकू लागले आहेत, त्यामुळे या गटाची अस्वस्थता जास्तच वाढलीये...
यांचे एक-एक कांड रोज उघडे पडायला लागल्याने कुठे तोंड लपवावं हे या गँगला कळेना झालंय... बेकारीची एक टांगती तलवार आता यांच्याही डोक्यावर लटकायला लागलीये...
नोटबंदीमुळे वरून येणारा नोटांचा ओघ तात्पुरता थांबलाय आणि cashless चा प्रचार करणारे यांची payments मात्र cashless करेना झालेत, कारण इतका पारदर्शीपणा यातल्या कुणालाच नकोय...
प्रत्येक post आणि comment मागे मिळणारा भत्ताही competition मुळे कमी झालाय असं कळलंय...
Trollsची आता खरंच खूप दया येतीये...
Dear trolls, Get well soon...

Tuesday, January 31, 2017

Gandhi

अपनी गलती मानने का धैर्य रखते हो, तो गांधी हो तुम|
दुसरों के दृष्टिकोन से देख पाते हो, तो गांधी हो तुम|
किसिका दर्द समझने की क्षमता रखते हो, तो गांधी हो तुम|
सच बोलने से अगर हिचकीचाते नही, तो गांधी हो तुम|
सबको साथ ले के चल सकते हो, तो गांधी हो तुम|
अपनी गलती मानने का धैर्य दिखा सकते हो, तो गांधी हो तुम|
अपने विचार समय अनुसार बदलना चाहते हो, बदल सकते हो, तो गांधी हो तुम|
लाठी और गोली को बिना डरे, अपने मार्गपर चल सकते हो, तो गांधी हो तुम|
Need और Greed के बीच का अंतर समझ सकते हो, तो गांधी हो तुम|
तुम्हारे संपर्क में आये लोहे का सोना बना सकते हो, अगर ऐसे पथ्थर हो तुम, तो गांधी हो तुम|
तुम गांधी से थोडा भी प्यार करते हो, तो खुद को भी प्यार करते हो तुम|
तुम गांधी से थोडी भी नफरत करते हो, तो खुद से भी उतनी ही नफरत करते हो तुम|
पागल है वो दुनिया, जो सिर्फ मोहनदासजी को गांधी समझती है,
 हर कोई, अपने अंदर एक गांधी ले के घुम रहा है, सिर्फ पहचनाने की जरुरत है।
आज, 30 जनवरी तो मोहनदासजी की पुण्यतिथी है, गांधी तो कभी मरते नही...

Thursday, January 26, 2017

#democracy_beyond_voting भाग-१

25 जानेवारी, 'राष्ट्रीय मतदार दिवस!' 

निवडणुकांचे दिवस असल्याने मतदान करा, मतदान करा, अशा तर घोषणा सगळीकडे चालूच आहेत,  लोकशाहीमध्ये मतदान करणं तितकंच आवश्यक देखील आहे. राजकीय नेते, सेलिब्रेटी, अभिनेते, खेळाडू असे बरेच जण आज मतदानाचं महत्व पटवून देताना दिसत आहेत. 

कोणतही election आलं असा कोणता दिवस आला, की असे अनेक उपक्रम राबवले जातातच, मतदार यादीमध्ये नाव नोंदवा, मतदानाचा दिवस सुट्टीचा न समजता एक कर्तव्य, जबाबदारी म्हणून मतदान करा, अशा आवाहनांपासून ते मतदान करणं लोकशाहीमध्ये सक्तीचं केलं जावं, मतदान न करणाऱ्यांना ठराविक योजना किंवा लाभ यांपासून वंचित ठेवलं जावं इथपर्यंत चर्चा, वादविवाद होतात. बरेचसे नागरिक अशा आवाहनांना प्रतिसाद देऊन आठवणीने मतदान करतात. याचा परिणाम म्हणून मतदानाचा टक्काही वाढताना दिसतो, मुख्यत्वेकरून जास्त मतदान म्हणजे सत्तापालट होण्याची जास्त शक्यता असा एक ढोबळमानाने अंदाजही बांधला जातो.

आपणही मतदान केलं म्हणजे आपलं राष्ट्रीय कर्तव्य पार पाडलं म्हणून निश्चिन्त होऊन जातो, आणि देशभक्तीचा आणखी एक मानाचा तुरा मिळवल्याचं प्रमाणपत्र म्हणून शाई लावलेल्या बोटाबरोबर social network वर आपला फोटो टाकून आपली खाजही भागवतो. अशी संधीही आपल्याला राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक स्वराज्य संस्था अशा अनेक वेळी मिळते.

मतदान केलं पण पुढे काय? पुढचं मतदान येईपर्यंत नागरिक म्हणून माझं कर्तव्य काय?
आपण आपले प्रतिनिधी निवडून दिले, ते आपलं काम करतीलच, प्रशासनही आपल्या नेमून दिलेल्या जबाबदाऱ्या पार पाडेलच. 
पण म्हणून एक नागरिक म्हणून माझं 5 वर्ष काहीच काम नाही का?
या 5 वर्षात नागरिकाचा नक्की role काय? भूमिका काय?

खरं तर मतदान करणं इथून नागरिकाची भूमिका एका अर्थाने सुरु होते...

to be continued....

झेक रिपब्लिक

'झेक रिपब्लिक', आपला कधी फारसा संबंध न येणारा देश, युरोप मध्ये कुठेतरी आहे, इतकंच माहिती, फुटबॉलचे फॅन असणाऱ्यासाठी कदाचित हे नाव जास्त ओळखीचं असेल...
तर पूर्व युरोप मधला हा एक छोटासा देश, शाळेतल्या इतिहासात पहिल्या, दुसऱ्या महायुद्धाच्या निमित्ताने या देशाचं नाव पहिल्यांदा ऐकलं असावं, त्या व्यतिरिक्त या देशाशी फारसा संबंध कधी आला नाही. जर्मनी, ब्रिटन या नावांसारखं glamour नसल्यानेही यांच्याकडे फारसं लक्षही कधी गेलं नाही.

आज या देशातल्या एका NGO च्या कार्यकर्तीशी संवाद साधण्याचा योग आला. ही संस्था आणि त्यांची एक कॉफी प्रक्रिया करणारी कंपनी याविषयीचे अनुभव ऐकता आले... 
ही कंपनी लॅटिन आणि मध्य अमेरिकेमधले काही देश आणि आफ्रिकेमधले काही देश इथून organic कॉफी आयात करते आणि process करून झेक मध्ये विकते.

प्रश्नोत्तरामध्ये, तुम्ही कॉफी आयात का करता? असा साधा सोपा प्रश्न एकाने विचारला आणि पुढे एक-एक अनेक गोष्टी उलगडत गेल्या.
प्रश्न साधा होता आणि 'झेक मधलं वातावरण कॉफी पिकवायला पोषक नाही,' इतकं साधं उत्तर होतं, पण त्यानंतर मिळालेली माहिती अधिक विचार करायला लावणारी, थोडी अस्वस्थ करणारी होती.

'झेक रिपब्लिक' आधी अन्न धान्याच्या बाबतीत बराच स्वयंपूर्ण होता, आधी म्हणजे साम्यवादी शासन असताना, आता सुपरमार्केट आणि जागतिकीकरणामध्ये आता हा देश अन्नासाठी आयातीवर जास्त अवलंबून आहे, साम्यवादी सरकारने तसं देशाचं काही फारसं भलं पण केलं नाहीच, पण शेती तरी निदान ठीकठाक होत होती.' अशी तिने अतिरिक्त माहिती पुरवली...

2004च्या सुमारास हा देश युरोपियन युनियन (EU) मध्ये सामील झाला, तुम्हाला युरोपभर कुठेही नोकरी, व्यवसाय करता येईल, हा फायदा होईल, तो फायदा होईल अशी बरीच आश्वासनं त्यांना देण्यात आली होती. 
'But, there are not enough jobs and there are not enough wages' is the real issue.'
तुमचं सरकार यावर काही करत नाही का?' असं विचारल्यावर तिने दिलेलं उत्तर म्हणजे, 'घरोघरी मातीच्या चुली' ही म्हण सार्थ ठरवणारंं... She said, 'Our government is a big joke'. 

'आधी इथे उजव्या विचारसरणीचं सरकार होतं, which was disastrous, जागतिक आर्थिक मंदीचा फारसा फटका बसलेला नसून सुद्धा या देशाच्या सरकारने आकडेवारीकडे दुर्लक्ष करून जागतिक संघटना, दबावगट यांच्यापुढे झुकून काही आतबट्याचे करार केलेे, आता social-democratic सरकार सत्तेवर आहे, but this one is totally 'hopeless' आणि आता पुढील निवडणुकांमध्ये परत उजव्या विचारसरणीचं सरकार येण्याची दाट शक्यता आहे, which will be again disastrous.'

पूर्वीच्या साम्यवादी सरकारच्या काळात 'सहकारी शेती'चे प्रयत्न सरकारी पातळीवरून करण्यात आले होते, पण लोकांच्या वर्षानुवर्षे असणाऱ्या जमिनी घेण्यात आल्या आणि सामूहिक शेती करण्यात आली, पण यात बरेच लोक दुखावले गेले आणि तो प्रयोगही शेवटी फारसा यशस्वी झाला नाही आणि त्यामुळे 'सहकार' या प्रकाराविषयी एक प्रकारची नाराजी इथल्या जनतेमध्ये निर्माण झाली.

आता तिथे आपल्या देशात पिकणारा माल विकत घ्या, सुपरमार्केट सोडून लोकल विक्रेत्यांकडून माल घ्या, असा मतप्रवाह हळूहळू रुजू पाहतोय.

जगभर थोड्या फार फरकाने हीच परिस्थिती आहे का सध्या? तिने जे सांगितलं ते कदाचित तिचं वैयक्तिक मत असेल, त्यात तिचे स्वतः चे bias असतीलही.

पण उजव्या विचारसरणीचे सरकार ठराविक उच्च किंवा उच्च मध्यमवर्गाला खुश करू शकतात, पण तळा गाळातल्या जनतेला मात्र हाती काही लागत नाही, त्यांचं नुकसानच जास्त होतं कदाचित...
म्हणून त्यांनी श्रमिकांच्या नावाने लढणाऱ्या लोकांचं सरकार निवडलं तर तो पर्यायही त्यांचे प्रश्न सोडवत नाही, अथवा सोडवू शकत नाही अथवा हे आंतरराष्ट्रीय दबावगट, संस्था अशी सरकारे फार काही करू शकणार नाहीत याची दक्षता घेतात आणि त्यांना अपयशी ठरवण्याचं काम करतात का?

झेक रिपब्लिक हा देश HDI ranking मध्ये जगात 14व्या नंबर वर आहे (0.85), तिथे गरीब म्हणजे, अन्न, वस्त्र, निवारा नसणारे असं तर नाही, तर खर्च व उत्पन्न याचा मेळ घालताना कसरत करावी लागणारे इतकाच असेल

पण भारत, आफ्रिकेमधले गरीब देश इथे अशा प्रकारांचे किती भयानक परिणाम झालेत, होत आहेत आणि होतील ना!

भांडवलशाही आणि यातले गट यांनी पर्यायी व्यवस्था उभी राहणार नाही याची दक्षता घेतली आणि घेत आहेत का?
आणि साम्यवादीही आपल्या पुस्तकी गोष्टीत, नाहीतर एका प्रकारच्या दमनशाहीत, नाहीतर व्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच यात गुंतल्याने जनतेची दीर्घकालीन साथ फारशी मिळवू शकले नाहीत का?

Friday, January 20, 2017

वाढदिवस

ज्यांनी शुभेच्छा दिल्या त्यांना मनापासून धन्यवाद, ज्यांनी दिल्या नाहीयेत त्यांना double धन्यवाद....
I stand by view/stand regarding this, which can be summarized as below:

वाढदिवस, वाढदिवस म्हणजे नक्की काय? तर जन्माला आल्यावर जशी अनेक जात, धर्म अशी जी फालतू लेबल लागतात, तसंच एक तारखेचं एक लेबल... (या तारखेचा कार्यालयीन आणि कायदेशीर बाबतीत फक्त उपयोग)

त्या दिवशी असही जगात काही विशेष घडलं नव्हतं, किंवा त्या विशिष्ट वेळेवर जन्मलो म्हणून माझ्याही आयुष्यात काही विशेष किंवा विशिष्ट काही घडणार नाहीये.

तो दिवस माझ्या आई-वडिलांसाठी, नातेवाईकांसाठी आनंदाचा दिवस नक्की असेल, पण म्हणून दरवर्षी त्याची आठवण काढून, साजरा करण्यात, मी काहीतरी special feel करून घेण्यात पण काही शहाणपणा नाहीये...

Let it be just a normal common day in a year....

पोलीस स्टेशनमधील अनुभव

काल रात्री wallet हरवलं, ATM cards, cash, driving license असं सगळं गेलं. तक्रार नोंदवलेली बरी, म्हणून आज सकाळी जवळच्या पोलीस स्टेशनला गेलो, त्याने नेहमीप्रमाणे आमच्या हद्दीमध्ये हे येत नाही, म्हणून हात झटकले आणि दुसऱ्या पोलीस स्टेशन ला पाठवलं. 
तिथे माझ्या आधीच दोन कॉलेज विद्यार्थी आले होते, mobile हरवला म्हणून. त्याची तक्रार पोलिसाने लिहून घेतली, कॉपी त्या मुलांना दिली, दक्षिणा पण घेतली. 
आता माझा नंबर आला, पाकीट कसं हरवलं वगैरे सगळं मी सांगितलं, काय काय होतं पाकिटात ते सांगितलं. 'Affidavit करावं लागेल, त्याची एक copy आम्हाला द्यावी लागेल मग आम्ही दाखला देऊ,' असं मला सांगण्यात आलं. 
हे सगळं टाळायचं असेल तर एक shortcut पण सांगण्यात आला (दक्षिणा देण्याचा). हा शॉर्टकट माझ्या कसा सोयीचा आहे, हे पण पुन्हा पुन्हा  मला सांगण्यात आलं. 
(दोन्ही ATM हरवले असल्याने पुरेसे पैसे जवळ नाहीत, affidevit महाग पडेल, त्यापेक्षा हा मार्ग तुझ्या सोयीचा आहे, कमी खर्चिक आहे, वगैरे वगैरे).
'मी स्वतः पारदर्शकता, लोकसहभाग, उत्तरदायित्व आणि या सर्वातून लोकशाही संवर्धन आणि भ्रष्टाचार निर्मूलन यासाठी काम करत असल्याने असे पैसे देणं मला पटत नाही, affidevit करणं खर्चिक असेल, पण ठीक आहे, affidevitसाठी कसे तरी पैसे manage करतो,' म्हणून मी सांगितलं. 
'शेवटी माणुसकी(?) म्हणून मी दाखला देतो, तुझ्या इच्छेने कितीही दे,' असं मला त्याने सांगितलं. 
'Sorry, पण मी काहीही देऊ शकत नाही, तुम्हाला शक्य नसेल तर ठीक आहे, मी affidevit करून आणतो, एखादा दिवस जाईल माझा, थोडे पैसे जास्त जातील, पण माझा इलाज नाही,' असं म्हणून मी उठण्याच्या तयारीला लागलो.
मग माझी बाकी इतर चौकशी करून झाली, कुठे job करतो, तिथे काय काम करतो, वगैरे, शेवटी पोलिसाला काय वाटलं माहित नाही, पण काही न देता-घेता दाखला मिळाला. पण आता त्यावर साहेबांची सही हवी होती, साहेब होते बाहेर, चहा प्यायला! मग त्याने मलाच सही आणायला पाठवलं. 
सही मागितल्यावर साहेबानी सही केली, पण 'फी दिली का?' असं विचारलं. मी नाही म्हणल्यावर, 'असं-कसं? फी द्यायला पाहिजे, मी फोन करतो, फी देऊन जा,' म्हणून सांगितलं. मी पुन्हा सांगितलं, की 'मी फी देणार नाही, असं मी आधीच सांगितलंय, तसंच ठरलंय.' पण साहेब ऐकेना. 'फी त्यांच्याकडे दे, मी फोन करतो,' म्हणून साहेबाने सांगितलं. 
सही केलेला कागद माझ्याकडेच होता, काम झालं होतं, गाडी जवळ होती, असंच कटता आलं असतं, पण आता पुढे काय होतं बघू तरी, ही उत्सुकता अधिक होती. परत दाखला देणाऱ्याकडे गेलो, तोपर्यंत साहेबाचा त्याला फोन आला होताच, तो साहेबाला समजावून सांगत होता, 'आता त्याला फी देणं पटत नाही, तर आपण काय करणार...? असं काहीसं संभाषण झालं, मी लांब असल्याने, नीटसं ऐकू आलं नाही. फोन झाल्यावर, 'साहेब माझ्याकडे फी मागत आहेत,' म्हणून मी त्याला  सांगितलं. 'माझं बोलणं झालंय, तू जा' इतकंच तो बोलला. मी निघून आलो.
वाटेत २ फुलं घेतली, परत पोलीस स्टेशनला गेलो, त्या पोलिसाला दिली. त्याने विचारलं, 'कशाबद्दल?' 
'तुम्ही तुमचं कर्तव्य नीट केलंत (शेवटी, नाइलाजाने) म्हणून, मला द्यावंस वाटलं, बरं वाटलं म्हणून', असं म्हणून मी shakehand साठी हात पुढे केला. 
'साहेब आले कि, एक फूल त्यांना देतो, Thank you' असं म्हणून त्यानेही shakehand केलं.

आज हे जमलं, यापुढे नेहमी असं वागणं होईल की नाही ते माहित नाही. यापूर्वी असं वागणं नेहमीच जमलंय असंही नाही, काही वेळा दक्षिणा दिली आहे, कधी passport साठी, कधी tripple seat चाललो होतो म्हणून, वगैरे. 
पण सरकारी ठिकाणी, खूप मजेशीर अनुभव येतात, आपण फक्त patience ठेवायचा, शांत राहायचं, भांडायचं नाही, आपलं म्हणणं नम्रपणे मांडायचं, ठाम रहायचं.

प्रेम

प्रेम हे आभाळातून पडणाऱ्या पावसाच्या थेंबाइतकं किंवा एखाद्या नितळ झऱ्याच्या पाण्याइतकं शुद्ध असतं....
दोष समाजाचा आहे, ज्याला फक्त well packaged, labled, branded drinking water च शुद्ध वाटतं...

पाणी जे जीवन आहे, या समाजाने त्याचंही commodification केलं आहेच, या समाजाने प्रेमाचीही तीच गत केली आहे...

हे Packaged water त्याच्या फक्त lableवर जरी शुद्धतेचे सर्व निकष पाळत असलं तरी समाजाला ते पुरेसं आहे, त्या पाण्याची खरी शुद्धता तपासण्याची त्याला फारशी गरजही वाटत नाही...
पण हाच समाज झऱ्याला मात्र या चाचण्यांना सामोरे जाण्याची एक संधीही देत नाही... आणि स्वतःच त्याची शुद्धता (अशुद्धता) ठरवून मोकळा होतो... यात झऱ्याची काय चूक...?

या packaged waterच्या मोहातून एकदा तरी बाहेर पडून पहा आणि या झऱ्याचा आस्वाद घेऊन तरी पहा...

इच्छा नसेल तर राहू दे! झऱ्याला तरी कुठे फरक पडतोय कोणी त्याचा आस्वाद घेतला नाही म्हणून... 
शेवटी पाणी ओंजळीने प्यायचं की बाटलीने प्यायचं हे ज्याचं त्यानं ठरवायचं...

बाटलीतलं पाणी संपेल, खरेदी करायला पैसे संपतील, पण झऱ्याचे aquifer मात्र पक्के आणि मजबूत आहेत, तिथलं पाणी कधीच संपणार नाहीये, तिथलं पाणी प्यायला कोणी अडवणारही नाहीये आणि पैसेही मागणार नाहीये 
आणि वारंवार ते पाणी भरायला पाऊस आहेच...

या झऱ्याला फक्त मनसोक्त खळखळत वाहायचं आहे...

निरंतर...

चरखा आणि बापू

चरख्याबरोबर दुसऱ्या कोणाचा फोटो टाकला म्हणून दुःख नाही, निषेध नाही, अशाने काही फरकही पडत नाही...

कुठे कोणता फोटो टाकायचा हा त्या designer च्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा प्रश्न असल्याने ते फोटो नष्ट करावेत, त्यावर बंदी घालावी अशी जराही इच्छा नाही, तशी मागणीही नाही...

यानिमित्ताने बापूंचे आम्हाला पुन्हा एकदा स्मरण झाले, हे ही काही कमी नाही...

याआधीही असे बऱ्याच लोकांचे फोटो होतेच म्हणे... 
चरख्यामागे बापू असोत, मी असो, तुम्ही असो, मोदी असोत, नाहीतर कोणी गांधी नावाचा दुसरा कोणी असो, चरख्यातून तर सूतच निघणार आहे...

चरखा चालवून सूत काढण्याचं बापूंकडे काही 'पेटंट' नाही...
या निमित्ताने, हे काही लोक बापूंच्या मार्गावर चालण्याचा प्रतिकात्मक तरी प्रयत्न करत आहेत! यात आक्षेप असण्याचं काही कारण नाही... आनंदच आहे...

आजच्या काळात चरखा ही वस्तू किती relevant आहे, हाच एक मोठा प्रश्न आहे...

यातून जरी भविष्यात कुणाचा असा समज झाला की सूत कातून स्वावलंबनाचा संदेश दुसऱ्याच कोणीतरी दिला, सर्वसामान्य लोकांना एकत्र आणून इंग्रजांविरुद्ध सत्याग्रहाची प्रेरणा दुसऱ्याच कोणीतरी दिली तरी काही हरकत नाही, आम्हालाही हरकत नाही, बापूंना ही हरकत नसावी...

आम्ही त्यांना विसरून गेलो तरी त्यांची हरकत नसावी, कारण शेवटी गरज पडली आणि आम्ही शोध चालू केला की हे दिखाऊ मुखवटे आपोआप गळून पडतील आणि खरे बापू आम्हाला भेटतीलच...

कुठेतरी आमच्याच मनातल्या अडगळीत....

Monday, January 2, 2017

रिकामटेकड्या डोक्यातील जळमट- जळमट तिसरे

या एकमार्गी, विस्तीर्ण रस्त्यावर डावी किंवा उजवी बाजू पकडून कायम चालणं गरजेचं आहे का?

कधीे किंचित डावीकडे, कधी किंचित उजवीकडे, कधी मधून, दोन्ही बाजूच्या लोकांना सोबत घेऊन जाण्यात खरी मजा नाहीये का...?

दोन्हीपैकी एका "पोथी_उघडा_school_of_thoughts" ला subscribe करणं compulsory आहे का?

पर्याय बरेच आहेत...
यात न पडता 'अज्ञानात सुख मानायचं'... हा सर्वात सोपा पर्याय आहे...
किंवा दोन्हीपैकी एका बाजूला आयुष्यभर पकडून राहायचं... हे ही तसं सोपं आहे...
नाहीतर जिकडं तात्कालिक 'वारं' घेऊन जाईल तिकडं जायचं... हे सोयीचं आहे...

हे सगळं जमत नसेल, तर मधून जायचं...
कोणी सोबत येईल, कोणी मार्ग दाखवेल, कदाचित दोन्हीकडचे काही लोक आपल्याला दूर ढकलण्याचा, आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्नही करतील, इथे आपला steeringवरचा control चांगला पाहिजे... हे थोडं अवघड आहे...
बऱ्याच महान लोकांनी यांची पर्वा न करता आपला मार्ग स्वतः निवडला आणि यशस्वी करूनही दाखवलाही, त्यांच्याकडून शिकण्याची आवश्यकता आहे....

(P. S.: तुम्ही मधून चालताना डावीकडच्याना तुम्ही उजवीकडे आणि उजवीकडच्यांना तुम्ही डावीकडे दिसणारच...! And vice-versa...)

रिकामटेकड्या डोक्यातील जळमट- जळमट दुसरे

माझ्या स्वप्नातील भारत सरकार
My dream Indian Government (English version is below)

राष्ट्रीय पातळीवर-
नीती आणि ध्येय-धोरणं काँग्रेस ठरवत आहे,
अंमलबजावणी भाजप करत आहे,
'नीती आणि कार्यक्रमाची अंमलबजावणी यांचे विश्लेषण' आणि सरकारी योजनांची जाहिरातबाजी साम्यवादी पक्ष करत आहेत,
राज्ये आणि स्थनिक स्वराज्य संस्था यांचा कारभार आप आणि इतर स्थानिक पक्ष पाहत आहेत (अस्मितेच्या मुद्यावर निर्माण झालेले पक्ष सोडून),
आणि माझ्यासारखा सामान्य नागरिक अधिक जबाबदार व जागरूक आहे...
सरकार आणि प्रशासन यांच्या नाड्या अशा नागरिकांच्या हातात आहेत (ideally सध्या आहेतच)
हे सर्वजण एकाच मंचावर आहेत आणि त्यांच्यात सुसंवाद आहे...

My dream Indian Government
At national level,
Congress is making Policies and Programs,
BJP is implementing it,
Communist Parties are providing Policy inputs, reviewing policies, analyzing and advertising Government schemes.
States and Local Governments are being governed by AAP and other regional parties (excluding the parties which are founded on the basis of different identities)
And a common citizens like me is more responsible & aware...
and the ultimate control of government & administration is actually with such citizens (which is ideally already there)
All these people are on the same platform and there is healthy communication between them.

रिकामटेकड्या डोक्यातील जळमट- जळमट पहिले

आपण कायम एका मसिहाच्या शोधात असतो, कोणीतरी येईल आणि आपलं दुःख दूर करून जाईल, आपल्या आजूबाजूचे problems चुटकीसरशी सोडवेल. 

कित्येक वर्ष आपण हा मसीहा (superhero) शोधत होतो आणि एकीकडे आजूबाजूची परिस्थिती आणखी बिकट होत आहे, असं वातावरण तयार होत होतं.

अशा काळात त्या superhero ची गरज अजूनच जास्त वाटायला लागली, अगदी अशाच वेळी एका व्यक्तीला आपल्या पुढे अतिशय पद्धतशीरपणे project केलं गेलं.
जो एकेकाळी त्याच्या अक्षम्य चुकांमुळे villain बनला होता, त्यालाच आता hero म्हणून आपल्या समोर आणण्यात आलं होतं.
त्याच्या पराक्रमाच्या खऱ्या-खोट्या कथा रंगवून आपल्याला सांगितल्या गेल्या. आपणही तात्कालिक शासनकर्त्याना इतके वैतागलो होतो, की आपण त्या प्रचाराला सहज बळी पडलो, तसाही दुसरा कोणताही पर्याय तेव्हा उपलब्ध नव्हताच.

आणि एका क्षणी आपण त्याला आपला नेता म्हणून निवडलं, त्या व्यक्तीला 'सुपरहिरो' मानलं. त्याच्या अगदी साध्या-साध्या कृतीलाही मोठा पराक्रम म्हणून दाखवलं गेलं.
त्याचा विजय हा आपला विजय, त्याची हार ही आपली हार हे समीकरण लवकरच आपल्या मनावर बिंबवलं गेलं.

आपण आपल्या सुपरहिरोचा पराभव कधी पाहू शकत नाही, सहन करू शकत नाही. खूप आशा-आकांक्षा जोडलेल्या असतात त्याच्या बरोबर!
आता त्या व्यक्तीचा पराभव आपल्याला आपला पराभव वाटतोय. म्हणून आपण इतक्या सहजा-सहजी तो स्वीकारत नाहीये...
आणि हा superhero खोटा ठरला तर पुढे काय? या प्रश्नाला सामोरे जाण्याचं धाडस आपल्यात नाहीये.

कधी नव्हे तो दिसलेला आशेचा दिवा, आपण सहजासहजी विझू द्यायला तयार नाहीये.

ही आपली आजची खरी समस्या आहे, आपण हतबल आहोत.
.
.
.
.
.
नवीन superhero मिळेपर्यंत...