Wednesday, February 15, 2017

Dear Trolls, Get well soon...

Trolls ओळखणं खूप सोप्पं आहे, सत्ताधारी पक्षाच्या आशीर्वादाने चालणारी ही एक नवी 'रोजगार हमी योजना' आहे...
आश्वासन दिलेले रोजगार निर्माण होत नाहीयेत, म्हणून ही योजना 'बुडत्या (बुडवलेल्या) अर्थव्यवस्थेला एक तुटक्या काडीचा आधार' ठरू लागलीये...
स्वतःचं असं काही न लिहू शकणारे आणि त्यामुळे trolls च्या post share करून स्वतः troll बनणारे आणि दुसऱ्यांची wall आपल्या किळसवाण्या पिचकाऱ्यांनी रंगावणारे यांची एक नवी जमात अलीकडे उदयास आलीये...
या योजनेचं वैशिष्ट्य म्हणजे हळूहळू सर्वच विचारधारांचे प्रतिनिधी म्हणवणाऱ्यानी कमी-अधिक प्रमाणात याचं अनुकरण करायला सुरुवात केलीये...
पण सध्या या योजनेवर गंडांतर आल्यासारखं दिसतंय. पूर्वी तुफान फॉर्मात असणाऱ्या, यांच्या जीवावर निवडणुका जिंकण्याचं स्वप्न पाहिलं जाणाऱ्या या योजनेला ग्रहण लागतंय की काय, अशी एक शंका दिसू लागलीये...
काहीही करा पण रोज अमुक इतक्या लोकांची लायकी काढाच, इतक्या लोकांच्या wall वर पिचकाऱ्या माराच
अशा target च्या pressure ने या लोकांची खूप दमछाक होतीये असं दिसतंय...
त्यामुळेच की काय पण अलीकडे troll ची quality of comment(?) पण बरीच घसरलेली दिसतेय, काहीही अजूनच फालतू आणि irrelevant comments ची संख्या वाढलेली दिसतेय...
सध्या photoshop या राष्ट्रीय सॉफ्टवेअरचं marketही पूर्वीपेक्षा down झालंय, लोक आता खरे-खोटे फोटो हळूहळू ओळखायला लागले आहेत, त्यामुळे troll ना करावी लागणारी मेहनत वाढलीये, त्यामुळे ही जमात अजूनच सैरभैर झालीये...
कानाशी गुणगुण करणाऱ्या डासाला झटकावं अगदी तसं लोक यांना आजकाल झटकू लागले आहेत, त्यामुळे या गटाची अस्वस्थता जास्तच वाढलीये...
यांचे एक-एक कांड रोज उघडे पडायला लागल्याने कुठे तोंड लपवावं हे या गँगला कळेना झालंय... बेकारीची एक टांगती तलवार आता यांच्याही डोक्यावर लटकायला लागलीये...
नोटबंदीमुळे वरून येणारा नोटांचा ओघ तात्पुरता थांबलाय आणि cashless चा प्रचार करणारे यांची payments मात्र cashless करेना झालेत, कारण इतका पारदर्शीपणा यातल्या कुणालाच नकोय...
प्रत्येक post आणि comment मागे मिळणारा भत्ताही competition मुळे कमी झालाय असं कळलंय...
Trollsची आता खरंच खूप दया येतीये...
Dear trolls, Get well soon...

No comments:

Post a Comment