Friday, January 20, 2017

पोलीस स्टेशनमधील अनुभव

काल रात्री wallet हरवलं, ATM cards, cash, driving license असं सगळं गेलं. तक्रार नोंदवलेली बरी, म्हणून आज सकाळी जवळच्या पोलीस स्टेशनला गेलो, त्याने नेहमीप्रमाणे आमच्या हद्दीमध्ये हे येत नाही, म्हणून हात झटकले आणि दुसऱ्या पोलीस स्टेशन ला पाठवलं. 
तिथे माझ्या आधीच दोन कॉलेज विद्यार्थी आले होते, mobile हरवला म्हणून. त्याची तक्रार पोलिसाने लिहून घेतली, कॉपी त्या मुलांना दिली, दक्षिणा पण घेतली. 
आता माझा नंबर आला, पाकीट कसं हरवलं वगैरे सगळं मी सांगितलं, काय काय होतं पाकिटात ते सांगितलं. 'Affidavit करावं लागेल, त्याची एक copy आम्हाला द्यावी लागेल मग आम्ही दाखला देऊ,' असं मला सांगण्यात आलं. 
हे सगळं टाळायचं असेल तर एक shortcut पण सांगण्यात आला (दक्षिणा देण्याचा). हा शॉर्टकट माझ्या कसा सोयीचा आहे, हे पण पुन्हा पुन्हा  मला सांगण्यात आलं. 
(दोन्ही ATM हरवले असल्याने पुरेसे पैसे जवळ नाहीत, affidevit महाग पडेल, त्यापेक्षा हा मार्ग तुझ्या सोयीचा आहे, कमी खर्चिक आहे, वगैरे वगैरे).
'मी स्वतः पारदर्शकता, लोकसहभाग, उत्तरदायित्व आणि या सर्वातून लोकशाही संवर्धन आणि भ्रष्टाचार निर्मूलन यासाठी काम करत असल्याने असे पैसे देणं मला पटत नाही, affidevit करणं खर्चिक असेल, पण ठीक आहे, affidevitसाठी कसे तरी पैसे manage करतो,' म्हणून मी सांगितलं. 
'शेवटी माणुसकी(?) म्हणून मी दाखला देतो, तुझ्या इच्छेने कितीही दे,' असं मला त्याने सांगितलं. 
'Sorry, पण मी काहीही देऊ शकत नाही, तुम्हाला शक्य नसेल तर ठीक आहे, मी affidevit करून आणतो, एखादा दिवस जाईल माझा, थोडे पैसे जास्त जातील, पण माझा इलाज नाही,' असं म्हणून मी उठण्याच्या तयारीला लागलो.
मग माझी बाकी इतर चौकशी करून झाली, कुठे job करतो, तिथे काय काम करतो, वगैरे, शेवटी पोलिसाला काय वाटलं माहित नाही, पण काही न देता-घेता दाखला मिळाला. पण आता त्यावर साहेबांची सही हवी होती, साहेब होते बाहेर, चहा प्यायला! मग त्याने मलाच सही आणायला पाठवलं. 
सही मागितल्यावर साहेबानी सही केली, पण 'फी दिली का?' असं विचारलं. मी नाही म्हणल्यावर, 'असं-कसं? फी द्यायला पाहिजे, मी फोन करतो, फी देऊन जा,' म्हणून सांगितलं. मी पुन्हा सांगितलं, की 'मी फी देणार नाही, असं मी आधीच सांगितलंय, तसंच ठरलंय.' पण साहेब ऐकेना. 'फी त्यांच्याकडे दे, मी फोन करतो,' म्हणून साहेबाने सांगितलं. 
सही केलेला कागद माझ्याकडेच होता, काम झालं होतं, गाडी जवळ होती, असंच कटता आलं असतं, पण आता पुढे काय होतं बघू तरी, ही उत्सुकता अधिक होती. परत दाखला देणाऱ्याकडे गेलो, तोपर्यंत साहेबाचा त्याला फोन आला होताच, तो साहेबाला समजावून सांगत होता, 'आता त्याला फी देणं पटत नाही, तर आपण काय करणार...? असं काहीसं संभाषण झालं, मी लांब असल्याने, नीटसं ऐकू आलं नाही. फोन झाल्यावर, 'साहेब माझ्याकडे फी मागत आहेत,' म्हणून मी त्याला  सांगितलं. 'माझं बोलणं झालंय, तू जा' इतकंच तो बोलला. मी निघून आलो.
वाटेत २ फुलं घेतली, परत पोलीस स्टेशनला गेलो, त्या पोलिसाला दिली. त्याने विचारलं, 'कशाबद्दल?' 
'तुम्ही तुमचं कर्तव्य नीट केलंत (शेवटी, नाइलाजाने) म्हणून, मला द्यावंस वाटलं, बरं वाटलं म्हणून', असं म्हणून मी shakehand साठी हात पुढे केला. 
'साहेब आले कि, एक फूल त्यांना देतो, Thank you' असं म्हणून त्यानेही shakehand केलं.

आज हे जमलं, यापुढे नेहमी असं वागणं होईल की नाही ते माहित नाही. यापूर्वी असं वागणं नेहमीच जमलंय असंही नाही, काही वेळा दक्षिणा दिली आहे, कधी passport साठी, कधी tripple seat चाललो होतो म्हणून, वगैरे. 
पण सरकारी ठिकाणी, खूप मजेशीर अनुभव येतात, आपण फक्त patience ठेवायचा, शांत राहायचं, भांडायचं नाही, आपलं म्हणणं नम्रपणे मांडायचं, ठाम रहायचं.

No comments:

Post a Comment