25 जानेवारी, 'राष्ट्रीय मतदार दिवस!'
निवडणुकांचे दिवस असल्याने मतदान करा, मतदान करा, अशा तर घोषणा सगळीकडे चालूच आहेत, लोकशाहीमध्ये मतदान करणं तितकंच आवश्यक देखील आहे. राजकीय नेते, सेलिब्रेटी, अभिनेते, खेळाडू असे बरेच जण आज मतदानाचं महत्व पटवून देताना दिसत आहेत.
कोणतही election आलं असा कोणता दिवस आला, की असे अनेक उपक्रम राबवले जातातच, मतदार यादीमध्ये नाव नोंदवा, मतदानाचा दिवस सुट्टीचा न समजता एक कर्तव्य, जबाबदारी म्हणून मतदान करा, अशा आवाहनांपासून ते मतदान करणं लोकशाहीमध्ये सक्तीचं केलं जावं, मतदान न करणाऱ्यांना ठराविक योजना किंवा लाभ यांपासून वंचित ठेवलं जावं इथपर्यंत चर्चा, वादविवाद होतात. बरेचसे नागरिक अशा आवाहनांना प्रतिसाद देऊन आठवणीने मतदान करतात. याचा परिणाम म्हणून मतदानाचा टक्काही वाढताना दिसतो, मुख्यत्वेकरून जास्त मतदान म्हणजे सत्तापालट होण्याची जास्त शक्यता असा एक ढोबळमानाने अंदाजही बांधला जातो.
आपणही मतदान केलं म्हणजे आपलं राष्ट्रीय कर्तव्य पार पाडलं म्हणून निश्चिन्त होऊन जातो, आणि देशभक्तीचा आणखी एक मानाचा तुरा मिळवल्याचं प्रमाणपत्र म्हणून शाई लावलेल्या बोटाबरोबर social network वर आपला फोटो टाकून आपली खाजही भागवतो. अशी संधीही आपल्याला राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक स्वराज्य संस्था अशा अनेक वेळी मिळते.
मतदान केलं पण पुढे काय? पुढचं मतदान येईपर्यंत नागरिक म्हणून माझं कर्तव्य काय?
आपण आपले प्रतिनिधी निवडून दिले, ते आपलं काम करतीलच, प्रशासनही आपल्या नेमून दिलेल्या जबाबदाऱ्या पार पाडेलच.
पण म्हणून एक नागरिक म्हणून माझं 5 वर्ष काहीच काम नाही का?
या 5 वर्षात नागरिकाचा नक्की role काय? भूमिका काय?
खरं तर मतदान करणं इथून नागरिकाची भूमिका एका अर्थाने सुरु होते...
to be continued....
No comments:
Post a Comment